वाकड येथे ऑनलाईन शॉपिंग केल्याचा ग्राहकाला फटका

0
slider_4552

पिंपरी :

‘फ्लिपकार्ट’ ऑनलाईन शॉपिंग केल्याचा मोठा फटका ग्राहकाला बसला. फ्लिपकार्ट संकेतस्थळावर मोबाईल ऑर्डर केल्यानंतर ग्राहकाला मेण भरलेल्या कव्हरची डिलिव्हरी करण्यात आली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. १८) सायंकाळी विनोदेवस्ती, वाकड येथे उघडकीस आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाकड येथील महेश विनोदे या तरुणाने पाच दिवसांपूर्वी ‘फ्लिपकार्ट’ या संकेतस्थळावर ‘सॅमसंग’ कंपनीचा २६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल ऑर्डर केला.

त्यासाठी त्यांने क्रेडिट कार्डद्वारे आगाऊ पैसे भरले. त्यानंतर सोमवारी एका कुरियर कंपनीचा डिलिव्हरी बॉय त्याच्या पत्त्यावर मोबाईलचे पार्सल देऊन गेला. महेश याने घरी आल्यानंतर पार्सल उघडून पहिले असता त्याला एका कव्हरमध्ये मोबाईलच्या वजनाचे मेण भरले असल्याचे दिसून आले.

त्याने तात्काळ संबंधित कंपनीशी संपर्क केला. मात्र, त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला देऊन जबाबदारी झटकल्याचे महेश याने बोलताना सांगितले. यापूर्वी देखील मोबाईलच्या पार्सलमध्ये वीट, साबण आल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे ऑनलाईन वस्तू खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

See also  जिल्ह्या परिषदेच्या निवडणुकीत पाच विद्यमान आणि माजी आमदारांचे पुत्र उतरणार