पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा अजित पवारांकडून राजीनामा

0
slider_4552

पुणे  :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. बँंकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी याबाबत माहिती दिली. राज्यातील पक्ष संघटनेची वाढती जबाबदारी, उपमुख्यमंत्री पदाचा वाढता व्याप यामुळे पुरेसा
वेळ मिळत नसल्याच्या कारणामुळे अजित पवार यांनी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा
राजीनामा दिला आहे.

अजित पवार है बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून
गेली 32 वर्ष बँकेचे प्रतिनिधित्व करत होते. 1991 पासून
अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैकिने मोठी आर्थिक प्रगती केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये देशातील सर्वात अग्रगण्य बँक म्हणून पुणे जिल्हा बैकेचा नावलौकिक आहे.

अजित पवार यांचा वाढ़ता व्याप विचारात घेता त्यांना
बैंकेच्या कामकाजाकडे वेळ देणे शक्य होत नसल्यानेच
त्यांनी संचालक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला
आहे. अजित पवार 1991 मध्ये जिल्हा बँकेचे संचालक
झाले, त्यावळेस बैकेचा एकूण व्यवसाय 558 कोटी रुपये
इतका होता. मात्र अजित पवारांनी सूत्र हाती घेतल्यानंतर
आज या बँकचा व्यवसाय 20714 कोटी रुपये इतका
विस्तारला आहे. हा व्यवसाय देखील सर्व जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँकांमध्ये सर्वाधिक आहे.

अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला असला तरी या पुढील काळात देखील पु्णे जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँक त्यांच्याच नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली
काम करेल असे दिगंबर दुर्गाडे यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्यामुळे आता त्यांच्या जागेवर ते कोणाला संधी देतात याबाबत देखील उत्सूकता निर्माण झाले आहे.

See also  शिरूर येथे बंद पडलेले वस्तीगृह सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेला हस्तांतरित करणार.