अहमदनगर :
अहमदनगर-आष्टी रेल्वेला वाळूंज जवळ आग लागली. ही घटना सोमवारी (दि. 16) दुपारी घडली. सुमारे तीन ते चार डब्यांना आग लागली. आगीचे कारण आणि जखमी प्रवाशांबाबत माहिती मिळू शकली नाही.







सोमवारी दुपारी अहमदनगर – आष्टी या रेल्वेला अचानक आग लागली. या आगीमध्ये रेल्वेचे इंजिन आणि त्यामागील दोन ते तीन डब्यांमध्ये ही आग पसरली. आग लागल्याचे जाणवताच काही प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या. तर रेल्वे थांबल्यानंतर काही प्रवासी बाहेर पडले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र यात रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीच्या घटनेत कोणी जखमी अथवा मयत आहे का याची पाहणी केली जात आहे. रेल्वेत प्रवासी संख्या मर्यादित असल्याने सर्वजण सुखरूप बाहेर पडले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.








