बालेवाडी :
बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या वतीने आयोजित सोसायट्यांच्या प्रतिनिधी सभेमध्ये औंध वार्ड आॕफिसचे प्रमुख गिरीश दापकेकर यांना आमंत्रित केले होते. त्यांचा सत्कार फेडरेशनचे उपाध्यक्ष ॲड.परशुराम तारे यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत श्रद्धा कामठे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन फेडरेशनचे सचिव ॲड.एस.ओ.माशाळकर यांनी केले.







या सभेमध्ये उपस्थित सदस्यांनी बालेवाडीतील रस्ते, ड्रेनेज, पाणी, कचरा या विषयावर आपापल्या समस्या तोंडी व लिखीत स्वरुपात सादर केल्या. सहाय्यक आयुक्त दापकेकर यांनी सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
सभे नंतर बालेवाडी फेडरेशनच्या मोरेश्वर बालवडकर , अमेय जगताप ,शकिल सलाटी , इंद्रजीत कुलकर्णी, अस्मिता करंदीकर, आशिष कोटमकर, वैभव आढाव, डि डि सिंग पदाधिकार्यांनी दापकेकर यांना बालेवाडीतील दसराचौक ते कुणाल एस्पायरी खराब रस्ता, भवानी मार्केट ते एफ रेसिडेन्सी तसेच पुढे सफायर पार्क पर्यंतचा रस्ता व ड्रेनेज समस्या, साई चौकातील मनपाने रु.९३ लाख खर्च करुन बांधलेली पण वापर करीत नसलेली भाजी मंडई, साई चौकातील कचरा विलगी करण सेंटर, लक्ष्मीमाता मंदिरा जवळील खराब रस्ता व खड्डे याचे दर्शन घडविले. तसेच बालेवाडी गावातील बौद्ध विहाराच्या इमारतीची गळती, त्या समोर पेव्हर ब्लाॕक बसवणे इत्यादी कामाची पाहणी करुन त्यांच्या अधिकार्यांना योग्यत्या सुचना दिल्या.
बालेवाडीतील लक्ष्मीमाता मंदिर ते कंम्पर्टझोन सोसायटी या २४ मीटर रोडचे गेल्या १३ वर्षापासुन काम चालु आहेे. तो लवकरात लवकर पुर्ण करावा अशी विनंती मोरेश्वर बालवडकर यांनी सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांना केली. दापकेकरांनी सागिंतले महापालिका लवकरच रोडचे टेंडर काढणार पुढील काही महिन्यात या रस्त्याचे काम सुरू होईल.*








