पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या फायरमन पदासाठी शारिरीक चाचणी 26 ऑक्टोबर पासून होणार सुरु

0
slider_4552

पुणे :

पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलामध्ये अग्निशामक फायरमन पदाची भरती प्रक्रिया सुरु आहे. यातील पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी 26 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर याकालावधीत होणार आहे. महापालिकेने अग्निशामक फायरमन पदाच्या 200 जागांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ऑनलाइन परिक्षेनंतर त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे.

ही शारिरीक चाचणी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस कार्यालयाच्या मैदानावर सकाळी सहा वाजता होणार असून पात्र उमेदवारांनी चाचणीसाठी पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण विभाग, पाषाण, यथे उपस्थित राहाणे आवश्‍यक आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे

मैदानी चाचणीनंतर या उमेदवारांची पोहणे व अग्निशमन साहित्याची ओळख यांची चाचणी परीक्षा सहकारनगरमधील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण भवनात होणार आहे. पात्र उमेदवारांची यादी, वेळापत्रक व उमेदवारांसाठी सूचना याची सविस्तर माहितीसाठी pmc.gov.in यावर संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

See also  मा.कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमीत्त सोमेश्वर फॉऊंडेशनच्या वतीने विनामुल्य महा आरोग्य शिबीराचे आयोजन.