कंत्राटी भरतीचा जीआर अखेर रद्द; देवेंद्र फडणवीस यांचा विरोधी पक्षावर पलटवार

0
slider_4552

मुंबई :

महाराष्ट्रात वादग्रस्त ठरलेल्या कंत्राटी भरतीचा जीआर अखेर रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून त्यांनी याबाबतची घोषणा केली. एवढेच नव्हे तर त्यांनी मोठ्या नेत्यांना एक्सपोज करणार असल्याचा इशाराही दिला आहे. कंत्राटी भरती हे 100 टक्के पाप असून हे पाप काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांनी केल्याचा आरोप करत त्यांनी हे पाप आपल्या माथी नको असे सांगत जीआर रद्द केला.

शिंदे फडणवीस सरकारच्या काळात सुरू असलेल्या कंत्राटी भरती विरोधात अनेक आंदोलने झाली. परंतु, विरोधकांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी अखेर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सर्वांसमोर विरोधी गटाची पोलखोल केली.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की कंत्राटी भरतीचा पहिला जीआर हा काँग्रेसने काढला होता. कंत्राटीकरणाचे पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. आणि आता त्याविरोधात ते स्वत:च आंदोलन करत आहेत. 2003 साली पहिली कंत्राटी भरती झाली. त्यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होते. 2021 साली देखील भरती झाली त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यामुळे हे पाप तिघांचे आहे. त्यांच्या पापाचे ओझे आमच्या सरकारने का उचलावे? असा सवाल करत कंत्राटी भर्ती रद्द केल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे

See also  ‘महायुवा’ ॲपचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण.