बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी २३ जानेवारीला.

0
slider_4552

मुंबई :

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारीला जयंती आहे. त्यानिमित्ताने मुंबईच्या कुलाबा परिसरातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात बाळासाहेब ठाकरे यांचा ९ फूट उंच असा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणारा आहे.

या पुतळ्याच्या उभारणीचे काम गेली चार वर्ष सुरू होते. गेल्यावर्षी या पुतळ्याचे काम पूर्ण झाले होते. परंतु, जी जागा मुंबई महापालिकेनं ठरवली होती. त्यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला होता म्हणून ही जागा बदलून घेण्यात आली होती. परंतु, नव्या जागेसाठी ही नवनवीन परवानगी मिळवी लागणार होती. याचे काम पूर्ण होईपर्यंत २३ जानेवारी २०२० हा दिवस निघून गेला होता.

२३ जानेवारी २०२१ ला आता या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार शशिकांत फडके यांनी हा पुतळा तयार केला असून, त्याचे काम जोगेश्वरी मातोश्री क्लब येथे पूर्ण करण्यात आले आहे. सध्या हा पुतळा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात चौथऱ्यावर उभा करण्यात आला असून या चौथर्‍याच्या खाली बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात करत असताना या ओळींचा वापर करायचे त्या ओळी कोरण्यात आलेले आहे. ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ असे हे शब्द असून या पुतळ्याचा चेहरा हा मंत्रालयाच्या दिशेने तर पाठ वास्तु संग्रहालयाच्या दिशेने आहे.

See also  कोविड काळात राजकारण करू नका ! देवेंद्र फडणवीस सहित कार्यकर्त्यांनचे नितीन गडकरी नी कान उपटले.