जखमी वाघांनी ऑस्ट्रेलिया ला लोळविले.

0
slider_4552

क्रीडा :

नुकताच ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चिवट झुंज देत यजमान ऑस्ट्रेलिया संघाला ३ विकेट्सने पराभूत केले. यासह २-१ च्या फरकाने भारताने कसोटी मालिका खिशात घातली. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने जबरदस्त चौकार मारत या सामन्याचा विजयी शेवट केला.

झाले असे की, सामन्याच्या शेवटच्या ९६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडने शार्दुल ठाकूरची विकेट काढली. त्यानंतर भारताला विजयासाठी अवघ्या ३ धावांची आवश्यकता होती. पुढील पाचव्या चेंडूवर स्ट्राईकवर असलेला पंत एकही धाव घेऊ शकला नाही.

त्यानंतर शेवटच्या चेंडूवर पंतने जोरदार शॉट मारला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी त्याचा चेंडू अडवण्याचा प्रयत्नही केला. परंतु ते अपयशी ठरले आणि चेंडू सरळ सीमारेषेबाहेर गेला.

पंतच्या या जबरा चौकाराला पाहून सामना विजयाच्या उत्साहाने मैदानाबाहेर बसलेले भारतीय खेळाडू वेगाने धावत मैदानावर उतरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने पंतच्या त्या मॅच विनिंग चौकाराचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला क्रिकेट रसिकांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवली आहे. सोबतच पंतचे कौतुकही केले आहे.

See also  भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगट करते कुस्ती सोडण्याचा विचार