राधे चित्रपट प्रदर्शनाबाबत सलमान खानची ट्विट वर घोषणा

0
slider_4552

मुंबई :

यंदा कोरोनामुळे अनेक चित्रपटांचं चित्रीकरणात अडथळा आला आहे. त्यात अनेक चित्रपटांचं प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आलं आहे. अशात अभिनेता सलमान खान याच्या राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याबाबत सलमान खानने मोठी घोषणा केली आहे.

त्यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार सलमान खान याची मोस्‍ट अवेट‍िंग चित्रपट ‘राधे’ चित्रपटगृहात रिलीज होणार आहे आणि सलमान खानने स्वत: याची माहिती दिली. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्याची विनंती थिएटर एग्जिबिटर्स एसोसिएशनने केली होती. त्यांनी ही बाब लक्षात घेऊन त्यांनी ईदच्या दिवशी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय ट्वीटमध्ये सलमानने सर्व थिएटर मालकांना कोरोना काळात अधिक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. थिएटरमध्ये राधे पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असल्याचंही त्याने यात म्हटलं आहे.

२०२० मध्ये ईदवर हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रीकरण पूर्ण होऊ शकलं नव्हतं. मात्र त्यानंतर पुढील काही महिन्यात चित्रीकरणापासून, पोस्ट प्रोडक्शनचं काम पूर्ण करण्यात आलं. प्रभुदेवा दिग्दर्शित ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ मध्ये सलमान खानसोबत दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ याचं चित्रीकरण करीत आहे. ज्यामध्ये त्यांच्यासोबत आयुष शर्मा लीड रोलमध्ये आहे. यानंतर सलमान खान आपल्या आणखी एका आगामी चित्रपट ‘कभी ईद कभी दिवाली’ चं चित्रीकरणदेखील करणार आहे.

See also  मुंबई हे जगातील दुसरे सर्वात प्रामाणिक शहर : आनंद महिंद्रा