संगमनेर :
मराठा आरक्षणासाठी आता प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज देखील मैदानात उतरले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी पुढील पाच दिवस आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांनी संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी भेट दिली आहे. आणि मराठा आरक्षणाला सक्रीय पाठिंबा दिला आहे.




इंदुरीकर महाराजांनी काल मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता. तर आज जोर्वे गावात कडकडीत बंद पाळला गेला तसेच एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या आंदोलनाला इंदुरीकर महाराजांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला. या सोबत त्यांनी आजपासून म्हणजेच सोमवार ते शुक्रवार एकही कार्यक्रम करणार नसल्याचे जाहीर केले.








