राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे पुण्यातील वाहतूकीत उद्यापासून दोन दिवस बदल

0
slider_4552

पुणे :

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून (दि. 29) तीन दिवस पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती विविध लष्करी संस्था, कृषी विद्यापीठाला भेट देणार आहेत. यावेळी उद्या (दि.30) व 1 डिसेंबर (गुरुवार) शहराच्या वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली आहे.

*वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे* –

1) पुणे शहरामधुन पुणे विमानतळ येथे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनचालकांनी उद्या दुपारी 1 ते 4 वाजे पर्यंत व परवा सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत पुणे नगर रोडवरील रामवाडी ते एअरपोर्ट रोडचा वापर करावा.

2) या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये लोहगांव ते विमानतळ ते विश्रांतवाडी येण्या- जाण्याच्या मार्गावर सर्व प्रकारच्या माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असेल.

3) गुरुवारी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत पुणे सोलापूर रोडवरील भैरोबानाला ते जेधे चीक (स्वारगेट) व भैरोबानाला ते पुणे स्टेशन (मोर ओढा मार्गे) या दोन्ही रस्त्यावर सर्व प्रकारच्या माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असेल.

4) पुणे विद्यापीठ ते पाषाण रोडवरील रायगड बंगला हा एकेरी मार्ग उद्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत फक्त व्हीव्हीआयपीसांठी दुहेरी करण्यात येत आहे.

तरी नागरिकांनी या बदलांची नोंद घेत वाहतूक कोंडी टाळावी, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.

See also  पुणे महानगरपालिकेत भाजपचीच सत्ता येणार : देवेंद्र फडणवीस