बाणेर :
निसर्गाच्या सानिध्यात तुकाई टेकडीवर घेतला विद्यार्थ्यांनी चित्रकलेचा आनंद. झाडांचे संवर्धन करण्यासोबत वसुंधरा अभियान चा अभिनव उपक्रम वसुंधरा चित्रकला स्पर्धा हे ८ वे वर्ष होते. रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जवळपास 850 हून अधिक विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग घेतला. निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या वातावरणात तुकाई टेकडीवर निसर्गसंपन्न निसर्गामध्ये चित्र काढण्याचा विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आनंद घेतला .







2006 पासून तूकाई टेकडी बाणेर, येथे वसुंधरा अभियान या संस्थेकडून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्य चालू असून 45 हजार पेक्षा जास्त झाडे लावून जगवली आहेत. महाराष्ट्र शासनाने नुकताच श्री शिवछत्रपती वनश्री पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी यासाठी संस्था दरवर्षी टेकडीवर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे विनामूल्य आयोजन करत असते .
परीक्षक म्हणून खेमचंद खैरनार, श्रीकांत शिंपी , कामिनी खैरनार, आरती शुळ, पल्लवी महाजन, तन्वी चांदवडकर, सुवर्णा टिळेकर, यांनी काम पाहिले. तत्काळ योग्य चित्राना न्याय देऊन स्पर्धेचा निकाल तासाभरात हाती दिला. गंधकोष ग्रुप मुलाकडून बाचाओ बचाओ वर पथनाट्य सादर करून प्रथमोपचार विषयी माहिती देण्यात आली. वसुंधरा अभियान सदस्यांनी जबाबदारी वाटून नियोजन केल्यामुळे व्यवस्थित स्पर्धा पार पडली.
चित्रकला स्पर्धेतील विजेते
5 वर्षे आतील मुले
1.अविका एस, 2.गौरंश जगदाळे 3. मनश्री देशमुख, 4. अथर्व गरड
पहिली ते चौथी
1.ओवी कोठावदे, 2. आद्या मुसाने, 3.स्वरा कोठाळे, 4.अनुष्का टिळेकर
पाचवी ते सातवी
1.नेहा मानमोडे, 2.वैभवी भांडारकर 3. आस्था महाडिक 4. अदीप सोनगिरे
आठवी ते खुला गट
1. आर्या धनकुडे, 2.अनुष्का कडू, 3. श्रेया घायतिडक, 4.मंगला वाडेकर आणि कोमल नवरखेडे
विशेष कलाकार पुरस्कार राजेंद्र कांबळे








