बाणेर :
वसूंधरा अभियान बाणेर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बाणेर बालेवाडी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि ३ जानेवारी रोजी राम मंदिर बाणेर गाव येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर रक्ताचा प्रचंड तुटवडा भासत आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सदर समस्येवर ऊपाय म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.




वसूंधरा अभियान चे हे रक्तदान शिबिराचे ७ वे वर्ष असून, वसूंधरा संस्था हरित कार्या बरोबर सामाजिक उपक्रमात देखील सक्रिय असते. रक्तदान शिबिर साठी प्रमूख पाहूणे म्हणून डाॅ. राजेश देशपांडे (BMA चे प्रमुख), संघ भाग संचालक दिलीप परब, ७९ वेळा विक्रमी रक्तदान केलेले दिनेश शहा ऊपस्थित होते.
लोकप्रतिनिधी, सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते, वसुंधरा सदस्य यांच्या ऊपस्थितीत रक्तदान शिबिर पार पडले. रक्तदात्यामध्ये महिलांचाही विशेष सहभाग होता. यावेळी ७० पुरुष व ३६ महिला असे एकूण १०६ बॅग्स रक्त संकलन करण्यात आले. यावेळी रक्तदात्यांना व जनकल्याण रक्तपेढी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना तुळशीचे रोप भेट देण्यात आले.








