मेट्रो ने बुजवलेला ओढा नागरिकांच्या मागणी मुळे झाला खुला…

0
slider_4552

बालेवाडी :

बालेवाडी येथील सर्वे नंबर ४ मध्ये साई चौक ते मुळा नदी पर्यंत जाणारा नैसर्गिक ओढा मेट्रो कर्मचाऱ्यांनी बुजविला होता. गेल्या अनेक महिन्यापूर्वी कामांमध्ये मेट्रो ने हा ओढा बुजवला होता. याची दखल घेत स्थानिक नागरिकांनी तक्रार करत प्रशासकीय यंत्रणेला जागे करत हा ओढा अखेर खुला करून घेतला.

या बुजवलेल्या ओढ्यामुळे परिसरातील सोसायटया मध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामूळे भविष्यात पावसाळ्यात ओढा बंद केल्याने ते पाणी सोसायटीत शिरण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने नागरीकांच्या अडचणी लक्षात घेऊन हा ओढा बुजविण्यास विरोध केला होता.

मेट्रो ने कोणाला हि दाद न देता ओढा बुझवत आणला होता‌. परंतु महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका आयुक्त यांच्या कडे पाठपुरावा केल्याने, त्यांच्या सहकार्याने नैसर्गिक ओढयाचा प्रवाह पुन्हा खुला करून भविष्यात होणारा धोका टाळला आहे, अशी माहिती याबाबत पाठपुरावा करणारे मोरेश्वर शिवाजीराव बालवडकर ( उपाध्यक्ष : उ. कोथरुड मतदार संघ. जॉइंटस सेक्रेटरी : बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन ) यांनी दिली.

See also  पाषाण येथे ई - कचरा आणि प्लास्टिक कचरा संकलन.