वाकडमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा

0
slider_4552

वाकड :

‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. 26 मौजे वाकड येथील वाकड चौक ते जगताप डेअरी चौक रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या अनधिकृत बांधकामांवर ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईमध्ये 22 अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. तसेच अंदाजे 29,000 चौ. फूट क्षेत्रफळाचे अनधिकृत वीट बांधकाम व पत्राशेड पाडण्यात आले.

ही कारवाई आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील आणि शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, सुनिल भागवणी, उपअभियंता शांताराम कोबल, विनायक माने, विजय भोजने, सुनील अहिरे कार्यालयीन अधिक्षक अरुणकुमार सोनकुसरे, कनिष्ठ अभियंता शाम गर्जे, गणेश लंगोटे, वैभव विटकरी, अमोल शिंदे, अमरजीत मस्के, सुशीलकुमार लवटे, अविनाश चव्हाण, दादासो सूर्यवंशी, जय कानडे तसेच महानगरपालिका अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा दल, पोलीस दल, सुरक्षा कर्मचारी आणि मजुर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यापुढेही शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई सुरूच राहणार असून कोणीही पदपथावर किंवा रहदारीस अडथळा ठरेल अशा प्रकारे अतिक्रमण करू नये. अतिक्रमण केल्यास महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.

See also  इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राज्य शासनाने स्वीकारला