ह.भ.प. शांतारामबुवा निम्हण यांचा अमृत महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न 

0
slider_4552

पाषाण :

वारकरी संप्रदायातील समाजभूषण ह.भ.प. शांताराम सयाजीबुवा निम्हण यांचा अमृत महोत्सवी सोहळा नुकताच ज्ञानदीप मंगल कार्यालय, पाषाण येथे पार पडला. यावेळी वारकरी संप्रदायातील व्यक्ती,पाषाण पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

या सोहळ्याला मा. खासदार नानासाहेब नवले, मा. आमदार उल्हास पवार, ह.भ.प. केशव महाराज नामदास, ह.भ.प. गोपाळ गोविंद गोसावी, ह.भ.प. बंडातात्या कराडकर महाराज, ह.भ.प. बाळासाहेब देहुकर महाराज, ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप,पार्वती शांतारामबुवा निम्हण आदी उपस्थित होते.

शांतारामबुवा यांच्या सात्विक, निरपेक्ष व सेवाभावी वारकरी जीवन यांचा अभिमान व कौतुक वाटते असे नानासाहेब नवले यांनी गौरवोद्गार काढले. यानिमित्ताने रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी व चष्मे वाटप तसेच पायी वारी करणार्यांसाठी मोफत विमा देण्यात आला.

यावेळी “सभाव भजन” या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा व गरजू वारकऱ्यांना मदत करण्याकरिता “समाजभूषण ह.भ.प. शांतारामबुवा निम्हण ट्रस्ट” करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी पसायदानाने केली. या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन पाषाण सुतारवाडी व सोमेश्वरवाडी ग्रामस्थ यांचेवतीने करण्यात आले होते.

See also  पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये पीएमपीएलने 10 रुपयांमध्ये दिवसभर वातानुकूलित प्रवास