पुणे :
गणेशखिंड येथील माँडर्न महाविद्यालयात चालू असलेल्या विविधा या कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञाना विषयी जनजागृती पर पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वच विभागातील एकूण पाच संघांनी सहभाग घेऊन तंत्रज्ञानाचे फायदे-तोटे आणि नव्या पिढीवर होणारे परिणमावर पथनाट्य सादर केले.




पथनाट्याच्या या स्पर्धेत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी बँकिंग लिटरसी या विषयावर नाट्य सादर करून प्रथम क्रमांक पटकावला, तर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी कॅन्सर डिटेक्शन अँड ट्रीटमेंट हा विषय सादर करत द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच मॉडर्न युनिव्हर्सिटी हा विषय सादर करत कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांमधील अभिनय गुणाची पारख करण्यासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच पत्रकार असलेले महेश कचरे, मोहसीन शेख यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून काळानुसार बदलत असलेल्या विषयांवर चर्चा केली. माईकशिवाय आवाज सगळ्यापर्यंत पोहोचविण्यचा प्रयत्न करा व समाजातील आजच्या विषयांवर सादरीकरण करा असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले. याचे आयोजन डाॅ. आबासो शिंदे यांनी केले, तर विविधाचे समन्वय डाॅ ज्योती गगनग्रास व प्रा. विजया कुलकर्णी यांनी केले. प्राचार्य डाॅ संजय खरात यांचे मार्गदर्शन लाभले.








