पीएमपीएमएलकडून शिवजयंतीनिमित्त भोसरी ते जुन्नर धावणार विशेष बस

0
slider_4552

पुणे :

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म ठिकाण असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून शिवभक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवितात. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून शिवभक्तांच्या सोयीसाठी दिनांक 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीकरीता खालील वेळापत्रकाप्रमाणे बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 *बसचे वेळापत्रक*

भोसरी ते जुन्नर बस सुटण्याच्या वेळा 5.30, 7.00, 8.30, 10.00, 1.30, 3.00, 4.30, 6.00 (शेवटची बस)

जुन्नर ते भोसरी बस सुटण्याच्या वेळा 9.30, 11.00, 12.30, 2.00, 5.30, 7.00, 8.30,10.00 (शेवटची बस)

तरी या बससेवेचा लाभ शिवभक्तांनी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाने केले आहे.

See also  जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी अद्ययावत आयटीएम्स यंत्रणा बसवणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस