रयत स्वाभिमानी संघटने कडून अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरे

0
slider_4552

पिंपरी चिंचवड :

आज जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम दिवस साजरा केला जातोय. अर्थातच हा दिवस प्रेमी युगलानी साजरा करायचा असतो मात्र पिंपरी चिंचवड मधील काही तरुण याला अपवाद ठरले आहेत.

या तरुणांनी आजचा व्हॅलेंटाईन त आपल्या प्रेयसी सोबत नाही तर चक्क झाडांसोबत साजरा केलाय. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या झाडांवर आपण जाहिरातींचे बोर्ड सर्रास बघतो मात्र असे बोर्ड लावण्यासाठी झाडांना भरमसाठ खिळे मारले जातात. ज्यामुळे झाडांना इजा तर होतेच शिवाय त्यांची वाढ देखील खुटंते, आणि वृक्षसंवर्धन कायद्याने झाडांवरील जाहिरातबाजी बेकायदेशीर ठरते.

मात्र ही बाब अनेकांना माहीत नसल्याने या बाबत जनजागृती व्हावी या हेतूने झाडे, खिळे मुक्त वेदना मुक्त करून हे तरुण दरवर्षी अशा अनोख्या पद्धतीने झाडांवरील खिळे काढलेल्या जागी गुलाबाची फुले अर्पण करून झाडांसोबत व्हॅलेंटाईन साजरा करतात आणि त्यामुळे या तरुणांच्या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून होऊ लागलय.

See also  खेळाडू दत्तक योजनेचा महापालिकेला विसर?