औंध शिवाजीनगर सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत “औंध कार्निवलला ” उद्या पासून सुरुवात… चार दिवस चालणार कार्यक्रमांची रेलचेल.

0
slider_4552

औंध :

नव महाराष्ट्र विकास संस्था तथा अँड. डॉ. मधुकर मुसळे माजी नगरसेविका अर्चना मुसळे आयोजित औंध – शिवाजीनगर सांस्कृतिक महोत्सवा अंतर्गत “औंध कार्निवल’ चे आयोजन दिनांक १६ ते १९ फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आलेले आहे.

औंध शिवाजीनगर परिसर, बाणेर बालेवाडी, बोपोडी, खडकी व तसेच पुणेकरांना सांस्कृतिक महोत्सवाची वेगळी मेजवानी देणे तसेच महिला सशक्तिकरण कार्यक्रमास प्रोत्साहन देणे हा या पाठीमागील उद्देश असून ह्या चार दिवसांमध्ये अनेक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन औंध मधील परिहार चौकाजवळ पोलीस ग्राउंड तसेच, परिहार चौकाच्या चारही दिशेला करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे विनोद वीर, खेळ पैठणीचा. दुसऱ्या दिवशी विंटेज कार, सुपर कार, सुपर बाईक सह तरुणांसाठी डीजे नाईट. तर तिसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्रा व स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम. चौथ्या दिवशी शिवजयंती अभिषेक, पोवाडा, कल्चर ऑफ इंडिया असे विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती अँड. डॉ.मधुकर मुसळे यांनी दिली.

या कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटी आकर्षण राहणार आहे. त्यामध्ये सोनाली कुलकर्णी, शर्वरी जेमेनीस, शिवरायांचा छावा, कन्नी चित्रपटातील कलाकारांची प्रत्यक्ष भेट व संवाद या ठिकाणी होणार आहे. मुलांसाठी आकाश पाळण्यासह खेळण्याचे विविध दहा प्रकार चिमुकल्यांच्या मनोरंजनासाठी येथे असणार आहेत. त्याचबरोबर रोबोटिकसहित अनेक खेळण्याचे प्रकार व किड्स शॉपिंगची धमाल असणार आहे. परिहार चौकाच्या चारही बाजूचे रस्ते सुशोभित केले जाणार असून त्या किड्स फेस्टिवल, शॉपिंग फेस्टिवल, फूड फेस्टिवल आयोजित केले आहे.

याबरोबर या चारही रस्त्यावर अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत यामध्ये ठिकठिकाणी संगीत वाद्य वाजविणारे कलाकार, झुंबा, स्ट्रीट प्ले जॉग्लर्स जादूगार, मेस्कॉट मुलांसाठी विविध खेळ इत्यादी विविध प्रकार रस्त्यावर नागरिकांना मुलांना बघायला व अनुभवायला मिळतील.

या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभाग, पर्यटन विभाग तसेच पुणे महानगरपालिकेचे व स्मार्ट सिटी चे सहकार्य असून सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या आर्किटेक्चर कॉलेजचा सहभाग असल्याची माहिती मुसळे यांनी सांगितली.

See also  औंध येथील डी मार्ट मध्ये डिझेल चोरीचा प्रकार उघडकीस