बालेवाडी हायस्ट्रिट २ उद्घाटन लोकसभाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न…

0
slider_4552

बालेवाडी :

बालेवाडी ममता चौक ते वाकड पुलाकडे जाणार्या रस्त्यातील फेज २ चे लोकार्पण पुण्यनगरीचे माजी महापौर प्रदेश भाजपा सरचिटणीस तसेच पुणे लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेद्वार मुरलीधर मोहोळ व पुणे शहर भाजपा अध्यक्ष धिरजजी घाटे यांच्या हस्ते संपन्न झाले.

गेली अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेल्या व पुणे महानगरपालिकेने सन २०१५-१६ साली ४० कोटी रुपये खर्च करुन उभा असलेल्या बालेवाडी वाकड पुलाकडे जाणारा हा रस्ता आता पुर्णत्वास येत आहे. मागील अनेक वर्षांपासुन या रस्त्याकरीता निधी उपलब्ध व्हावा व तातडीने हा रस्ता पुर्ण करुन बाणेर बालेवाडी येथील वाहतुक कोंडीची गंभिर समस्या सुटावी याकरीता मी व माझ्या सहकारी नगरसेविका ज्योतीताई कळमकर तसेच स्वप्नालीताई सायकर कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतो, असे मत अमोल बालवडकर यांनी मांडले.

अलिकडच्या काळात चंद्रकांत पाटील यांनी या रस्त्याकरीता भरघोस निधी उपलब्ध करुन दिला व आज या रस्त्यातील फेज २ चे लोकार्पण संपन्न झाले. सदर रस्त्यातील ७०% रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे तरी उर्वरीत ३०% जागेच्या भुसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असुन लवकरच हा रस्ता देखिल पुर्ण करण्यात येईल. तसेच संपुर्ण रस्ता बालेवाडी-वाकड पुलापर्यंत नागरीकांसाठी खुला करण्यात येईल.
या नविन रस्त्याच्या उद्धाटनाच्या निमित्ताने अमोल बालवडकर फांऊंडेशच्या वतीने “हॅपी स्ट्रिट बालेवाडी २०२४” चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध खेळ, डान्स, झुंबा, लाईव्ह म्युजिक, बॅडमिंटन, टॅटु आर्टिस्ट, मर्दानी खेळ, बालजत्रा, कॅरम, जादुगार अशा विविध प्रकारच्या मनोरंजनाचे देखिल आयोजन करण्यात आले होते.

या हॅपी स्ट्रिट कार्यक्रमात बाणेर-बालेवाडी, सुस-म्हाळुंगे, पाषाण-सोमेश्वरवाडी-सुतारवाडी भागातील शेकडो नागरीकांनी, चिमुकल्यांनी, महिलांनी व ज्येष्ठ नागरीकांनी आपल्या परिवारासह उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला.
तसेच यावेळी अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने परिसरातील स्केटींग प्रेमिंकरीता विविध वयोगटातील स्केटींग स्पर्धेचे देखिल आयोजन केले गेले होते. यामधील विजयी स्पर्धकांना मेडल व पारितोषक देवुन सन्मानित केले गेले.

See also  मनुष्यवस्तीत सापडलेल्या गवाला अखेर आपले प्राण गमवावे लागले..... 

यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, पुण्यनगरीचे माजी महापौर प्रदेश भाजपा सरचिटणीस तसेच पुणे लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेद्वार मुरलीधर मोहोळ व पुणे शहर भाजपा अध्यक्ष धिरजजी घाटे, माजी नगरसेविका ज्योतीताई कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, माजी नगरसेविका हर्षालीताई माथवड, पुनितजी जोशी, सचिनजी पाषाणकर, डॅा.संदिपजी बुटाला, माजी महापौर दत्तात्रयजी गायकवाड, प्रकाशतात्या द. बालवडकर, प्रकाशतात्या कि. बालवडकर, गणेशजी कळमकर, प्रल्हादजी सायकर, लहुशेठ बालवडकर, नारायणजी चांदेरे, अनिलबाप्पु ससार, शशिकांतजी बालवडकर, ह.भ.प.संजयबाप्पु बालवडकर, आत्माराम बालवडकर, उमा गाडगीळ, काळुरामजी गायकवाड, दिनेशजी माथवड, शरदजी भोते, नितीनजी रनवरे, संतोष बालवडकर, माऊलीतात्या बालवडकर, अस्मिता करंदिकर, शिवम बालवडकर, मोरेश्वर बालवडकर, सुभाष भोळ, रोहन कोकाटे, राजेंद्र पाडाळे, प्रमोद कांबळे, कल्याणी टोकेकर भारतीय जनता पार्टी कोथरुड विधानसभेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच औंदुबर ग्रुप बालेवाडी, अष्टविनायक मित्र मंडळ बालेवाडी व अमोल बालवडकर फाऊंडेशचे सर्व सभासद तसेच नागरीक उपस्थित होते.