राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर, ‘यांना’ मिळाली उमेदवारी

0
slider_4552

पुणे :

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिली यादी 5 उमेदवारांची असून लवकरच दुसरी यादी देखील जाहीर होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

अपेक्षप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांना चौथ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. त्यांची लढत बंधू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी होण्याची शक्यता आहे. या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर, शिरुर लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना दुस-यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांची लढत शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या शिवाजीराव आढळराव यांच्यासोबत लढत होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारकीच्या राजीनामा दिलेल्या निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांची लढत भाजपचे सुजय विखे यांच्याशी होणार आहे. तर, वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्करराव भगरे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे.

See also  पदोन्नती आरक्षणाचे संधीसाधू राजकारण आणि राज्यातील खुल्या व ओबीसी कर्मचाऱ्यांत अस्वस्थता