निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची दुसरी सरमिसळ संपन्न

0
slider_4552

पुणे :

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मावळ, पुणे आणि शिरुर मतदारसंघात नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय दुसरी सरमिसळ निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली.

यावेळी मावळ मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदीती राजशेखर , पुणे मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर, शिरुर मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक कुमार सौरभ राज, जिल्हाधिकारी तथा पुणे मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे, मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला, शिरुर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, मनुष्यबळ समन्वयक अधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.

मावळ मतदारसंघातील पुणे जिल्ह्यांतर्गत तीन विधानसभा क्षेत्रातील 1 हजार 339 मतदान केंद्रासाठी 6 हजार 594 आणि रायगड जिल्ह्यांतर्गत तीन विधानसभा क्षेत्रातील 1 हजार 227 मतदान केंद्रासाठी 5 हजार 448, पुणे लोकसभा मतदारसंघाच्या 2 हजार 18 मतदान केंद्रासाठी 11 हजार 176 आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील 2 हजार 509 मतदान केंद्रासाठी 11 हजार 586 अधिकारी-कर्मचाऱ्यांची सरमिसळ संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आली.

या सरमिसळ प्रक्रीयेच्या माध्यमातून संबंधित विधानसभा क्षेत्रातील पथक निश्चित झाले असून विधानसभा क्षेत्रस्तरावरील दुसऱ्या सरमिसळ प्रक्रीयेत मतदान केंद्रासाठी पथक निश्चित होईल.

See also  भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज पंढरपूरकडे प्रस्थान..