मतदार यादीतील नाव शोधणे कामी Voters Help Desk ची स्थापना

0
slider_4552

पुणे :

लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदारांना मतदार यादीतील नाव शोधणेकामी Voters Help Desk ची स्थापना करण्यात आली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत नाव सापडत नसले बाबतच्या नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने, सदर मतदारांना मतदानाचे दिवशी मतदार यादीतील नाव शोधणे सहज शक्य होईल याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत Voters Help Desk तयार करुनि ERO Net प्रणालीवर कामकाज करणा-या 2 कर्मचा-यांची नेमणूक करणे कामी कळविले होते.

त्यानुसार 33 मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत 205 चिंचवड विधानसभा मतदार संघाकडील Voters Help Desk च्या कामकाजासाठी अनिल कुदळे, मुख्य लिपिक, अमर कांबळे, कॉम्प्युटर ऑपरेटर यांची नेमणूक करणेत आलेली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार यांना आवाहन करण्यात येते की, या सुविधेचा वापर करुन आपले मतदान केंद्र माहिती करुन मतदानाच्या दिवशी मतदान करुन लोकशाहीच्या उत्सव पर्वामध्ये सहभागी व्हावे.

See also  कोरेगाव भीमा प्रकरणी दोषींवर कारवाई करणार : गृहमंत्री