सातारा :
कोरेगाव-भीमा प्रकरणी महाविकास आघाडी सरकारने कारवाई करण्यासाठी पावले उचलले आहेत. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून जर ते दोषी आढळले तर कारवाई केली जाईल, सर्वच पुरावे चाचपले जातील अशी भूमिका अनिल देशमुख यांनी स्पष्ट केली होती.
कोरेगाव-भीमा प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे या दोघांवर रीतसर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. आता, ‘जे पुरावे पुढे येतील, त्या पद्धतीने कारवाई होईल, यात कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही,’ असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी अद्याप दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी कोरेगाव भीमा शौर्यदिनी दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येत आहे