एसटीच्या चालक, वाहकांना दोन कर्तव्यांमध्ये नऊ तासांची सक्तीची विश्रांती

0
slider_4552

पुणे :

एसटी बसचे अपघात टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. चालक आणि वाहकांच्या दोन कर्तव्यामध्ये नऊ तासांचे अंतर असणे आवश्यक असल्याच्या सूचना महामंडळाकडून आगर प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

पुणे विभागात पिंपरी-चिंचवड, तळेगाव, शिवाजीनगर, स्वारगेट, भोर, नारायणगाव, राजगुरुनगर, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, मंचर आगार आहेत. इथून स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात. सलग अनेक तास बस चालवल्याने अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे काही वेळेला गंभीर अपघात देखील होतात.

असे अपघात टाळण्यासाठी परिवहन महामंडळाने चालक आणि वाहकांना पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक असल्याने दोन कर्तव्यांच्या मध्ये नऊ तासांची विश्रांती देण्याच्या सूचना आगार प्रमुखांना दिल्या आहेत.

एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना 50 टक्के सवलतीच्या दरात प्रवास आणि इतर सवलती दिल्या जातात. त्यामुळे प्रवाशांची एसटीला पसंती वाढत आहे. अनेक वेळेला लांब पल्ल्याच्या एसटीचे चालक दोन्ही मार्गावरील प्रवास विश्रांती न घेता एकापाठोपाठ करतात. प्रवाशांचा सुरक्षित प्रवास होण्यासाठी महामंडळाने विश्रांतीचा निर्णय घेतला आहे.

See also  कचरा डेपो स्थलांतरित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार : नाना काटे