पुणे :
मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची महासभा आज बुधवार (दि. 8) सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर होणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित असणार आहेत.आज बुधवार (दि. 8) सायंकाळी सहा वाजता महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा विधान परिषद सदस्य आमदार जयंत पाटील, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख तथा आमदार सचिनभाऊ अहिर, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह, काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे हे प्रमुख वक्ते आपले विचार मांडणार आहेत.