पुणे :
मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड येथिल कला, विद्यान आणि वाणीज्य(स्वायत्त) महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, महाविद्यालयची माजी विद्यार्थिनी आणि योग प्रशिक्षक पल्लवी नायक आंबेडकर यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय सहकारी यांना योगशास्त्राचे प्रशिक्षण दिले .







योग, प्राणायाम आणि ध्यान या माध्यमातून हे प्रशिक्षण घेण्यात आले ,प्रत्येक आसनाचा अर्थ व प्राणायामाचे महत्व त्यांनी शास्त्रीय दृष्टीकोणातून समजावून संगितले
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा हा 10 वा वर्धापन दिन आहे स्वत:साठी व समाजासाठी योग अशी या वर्षीच्या योग दिनाची थीम आहे.
प्राचीन भारतातील योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून मन, शरीर आणि आत्मा यांचा समावेश असलेला एक समग्र सराव आहे , आत्मशोध , आंतरिकशांती आणि वैयक्तिक वाढीचा मार्ग योग प्रशिक्षण या मुळे प्राप्त होतो श्वास, हलचाली आणि ध्यान यांच्या एकात्मतेद्वारे योग आपल्याला स् भोवतालच्या जगाशी एकतेची आणि परस्परसंबंधांची भावना वाढवून आपल्याला खर्या स्वची ओळख करून देतो.
नियमित योग सरावा मुळे शारीरिक ताकद वाढते ,लवचिकता निर्माण होते , शरिराचे संतुलन सुधारते एकूणच आरोग्य सुधारते आणि मानव कल्याण होते असे विचार या कार्यक्रमात मांडण्यात आले.
याशिवाय सात मूलभूत योगासन
उदाहरणार्थ:-सुखासन,परिवृत्त सुखासन,बद्ध कोनासन, बालासन
बिटिलासन,ताडासन, त्रिकोणासन, वृक्षासन या विषयी माहिती देण्यात आली.
कर्नल वि के मॉल, सेनापदक कमांडिंग अधिकारी, मेजर येशु मुतलग, प्रशासकीय अधिकारी, २महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी पुणे यांनी एन सी.सी.कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.एन सी.सी.चे सर्व कॅडेस् या कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्राचार्य डों संजय खरात यांनी प्रशिक्षक यांचा सौ पल्लवी नायक आंबेडकर सत्कार केला व कार्यक्रमास मार्गदर्शन केले ,डों वर्षा जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले, उपप्रचार्य ज्योती गगनग्रास व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्र्म अधिकारी प्रा कुमुद सपकाळ यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले व एन सी सी कार्यक्रमाचे संयोजन लेफ्टनंट डॉ. प्रतिभा राव यांनी केले.








