पुणे :
आयसर पुणे या संशोधन संस्थेमार्फत २६ जून २०२४ रोजी आयोजीत केलेल्या मॉलिक्युलर बायोलॉजी या एक दिवसीय कार्यशाळेत लक्ष्मणराव आपटे प्रशालेतील इ १०वी च्या वर्गातील १० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन शास्त्रज्ञ डॉ. स्नेहा भोगले यांनी केले.







या कार्यशाळेत आयसर मधील प्रयोगशाळेत डी.एन.ए. कसा ओळखायचा ? हे प्रयोगातून कसे तपासून पाहावे ? या करिता सहभागी विद्यार्थ्यांना वेगवेगळे डी एन.ए. चे नमुने देण्यात आले होते. त्या वरून हा कोणाचा डी.एन.ए. आहे ? हे वेगवेगळ्या प्रयोगातून विद्यार्थ्यांनी शोधून पाहिले. हा अनुभव विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच प्रत्यक्ष मिळाला. विद्यार्थ्यांचा सहभाग सक्रीय असल्यामुळे ते आनंदी होते.

या उपक्रमात प्रशालेतील विद्यार्थी यश भोरे,सृष्टी निंभोरे , तेजस गुरव , रोहित हिप्परगे , कौतूभ परदेशी , विराज कोकाटे , ओम चौधरी , वेदांत जाधव , वेदांत देवकर , पार्थ कोकीळ हे दहा विद्यार्थी व विज्ञान – गणित शिक्षक श्री. भगवान पांडेकर सर यांचा सहभाग होता.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या प्राचार्या सौ. मेधा सिन्नरकर मॅडम , पर्यवेक्षक श्री.गौतम मगरे सर यांनी बहुमोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या उपक्रमास सो. गुळवणी मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.









