पुण्यात झिकाच्या रुगणामध्ये वाढ, संख्या 15 वर…

0
slider_4552

पुणे :

सध्या पुण्यात झिका व्हायरस चांगलेच डोके वर काढत आहे. रुग्णांची संख्या 15 वर गेली आहे.यामध्ये गर्भवती महिलांची संख्या 8 वर गेली आहे. मंगळवारी (दि.9) पाषाण परिसरातील दोन गर्भवती आणि उजवी भुसारी कॉलनीतील 15 वर्षाचा मुलगा अशा तीन जणांना झिका विषाणूच्या संसर्गाचे निदान झाले.

या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर घरातच उपचार सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.आतापर्यत एरंडवणे, मुंढवा,डहाणूकर कॉलनी, पाषाण, आंबेगाव बुद्रक, खराडी आणि कळस या भागात रुग्ण आढळले आहेत. त्यात आठ गर्भवतींचा समावेश आहे. गर्भवतींचे प्रमाण जास्त आसल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

दोन तरुणींना संसर्ग असल्याचे निदान प्रयोगशाळेतील अहवालातून स्पष्ट झाले. एक तरुणी 18 वर्षाची असून ती 28 आठवड्यांची गर्भवती आहे. दुसच्या तरुणीचे वय 19 असून ती 23 आठवड्यांची गर्भवती आहे. त्यांना सांधेटुखी आणि डोकेटुखी ही ठळक लक्षणे दिसत होती, त्यामुळे त्यांचे रक्त नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले होते. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, झिका च्या रुगणांमध्ये 4 पुरुष, 11 महिला, त्यात 8 महिला गर्भवती आहेत.

या पार्भूमीवर 42 हजार 759 लोकांचे आत्तापर्यंत सर्वेक्षण करण्यात आले आहे. हा आजार डासांपासून पसरत आहे. यामध्ये रुग्णाला ताप, अंगदुखी, पुरळ, डोकेदुखी, सांधेदुखी, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे नागरिकांनी डास उत्पत्तीवर प्रतिबंध करत व्हायरसची लक्षणे दिसताच त्वरीत नजीकच्या रुग्णालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

See also  लहू बालवडकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चैतन्यस्पर्श कार्यक्रमाचे बावनकुळे यांनी केले भरभरून कौतूक….