दारु पिऊन गाडी चालवल्यास तीन महिन्यासाठी वाहन परवाना होणार रद्द

0
slider_4552

पुणे :

‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी मद्यपी चालकांविरोधात कड़क कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे आता या सर्वाचे तीन महिन्यासाठी वाहन परवाने रद्द होणार आहे.

गेल्या काही दिवसात शहरात अपघाताच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्या पार्श्भूमीवर मागील सात महिन्याच्या कालावधीत एक हजार 684 दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांनी दारु पिऊन गाडी चालवल्याचं पुणे पोलिसांना विविध कारवाई दरम्यान आढळून आले आहेत. पुणे पोलिस विभागामार्फत शहरातील विविध भागात अनेक कारवाया करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकावर सातत्याने कारवाई केली जात आहे.

त्या कारवाईबाबत सांगायचे झाल्यास मार्गील सात महिन्यांमध्ये 1 हजार 684 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच संबंधित चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, याबाबतचा अहवाल आरटीओ कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे या सर्वांचे तीन महिन्यासाठी वाहतूक परवाना रद्द होणार आहे.

एखाद्या चालकाने दुसच्यांदा अशा स्वरूपाचा गुन्हा केलेला आढळून आल्यास सहा महिन्यांकरीता परवाना रद् होईल. त्यानंतर तिसच्यांदा त्याच व्यक्तीने अशा स्वरूपाचा गुन्हा केल्यास कायमचा परवाना रद्द होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालकाने दारू पिऊन वाहन चालवू नये, या कारवाई दरम्यान पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी वर्गासोबत वाद घालू नये, असे आवाहन देखील पुणे पोलिसांनी केले आहे.

See also  सरकार हमी भाव कायदा आणणारा का? : मेधा पाटकर