पुणे :
गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पुणे जिल्हयातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ,मुळशी, हवेली आणि खेड तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलटी) या भागातील शाळा 25 ज़लै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही सोशल मिडिया एक्सच्या माध्यमातून देखील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत हे सांगितले आहे.
https://x.com/mohol_murlidhar/status/1816286200631644451