पुणे :
सिंहगड, खडकवासला परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने पावसाचा रविवारी ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे. परिणामी रविवारी गड पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. वन विभागाने कळविले आहे.
गडावर जाणाऱ्या घाट रस्त्यात मंगळवारी (30) पहाटे डोंगराचा मोठा भाग मोठ्या झाडांसह कोसळून रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद केली आहे. दरडी काढण्याचे काम त्याच दिवशी सुरू केले आहे. शुक्रवारी ही काम सुरू होते. सिंहगडावर जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दरड काढण्याच्या कामात अडथळे येत आहेत.
सिंहगडावर मुसळधार पाऊस पडत असल्याने दरडीतील मातीचा चिखल झाला आहे. चिखल काढण्यास वेळ लागत आहे. परिणामी दरड काढण्याचे काम सुरु आहे. शुक्रवार आणि शनिवारी अतिवृष्टी झाली आहे. रविवारी देखील मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सिंहगड वाहनांना बंद करण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.