मुंबई :
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना आणि पक्षाला तीन दिवस प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियात जाहिरात द्यावी लागणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.




कुमार म्हणाले की, ज्या उमेदवारांवर तीन गुन्हे दाखल असतील. त्या उमेदवारांना प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जाहिरात प्रसिद्ध करुन त्याबाबत डिक्लरेशन द्यावे लागेल. याशिवाय त्या पक्षांनाही अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला का उमेदवारी दिली, याची अशीच जाहिरात द्यावी लागेल. तीन दिवस पक्ष आणि उमेदवाराला जाहिरात प्रसिद्ध करावी लागेल. अन्यथा त्या उमेदवारावर कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यामध्ये 288 विधानसभा मतदारसंघ असून 1 लाख 186 पोलिंग बूथ आहेत. तसेच 9.53 कोटी मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार 4.93 कोटी तर स्त्री मतदार 4.60 कोटी आहेत. राज्यात खुल्या प्रवर्गासाठी 234 मतदारसंघ आहेत. तर 25 मतदारसंघ एसटी आणि 29 मतदारसंघ एससीसाठी राखीव आहेत.








