महाविकास आघाडीचं ठरलं! 200 जागांवर एकमत मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतर चर्चा करून ठरवू

0
slider_4552

मुंबई :

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल हे आम्ही निवडणुकीनंतर ठरवू, आता चर्चा करणे योग्य नाही, आमच्यासाठी तो विषय संपला आहे. मविआची पत्रकार परिषद झाली तेव्हाच हा विषय ठरला. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि मी स्वतः होतो. जयंत पाटील यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी आहेच. ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत,जागांबाबतचा निर्णय जयंत पाटील घेणार आहेत, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडले. दरम्यान पवार पुढे बोलताना म्हणाले की,महाविकास आघाडीत 288 पैकी 200 जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित जागांसाठी बैठक होईल.बैठकीला तिन्ही पक्षांचे अध्यक्ष हजर राहतील.निर्णय घेतील आणि आम्हाला सांगतील.

शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत जसा पिपाणीचा फटका बसला तसा फटका यावेळी बसेल का असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, लोकसभेला जे चित्र होते ते स्पष्ट झालेले नव्हते. आता आम्ही स्पष्ट केले आहे. हरियाणात भाजप सरकार होते ते कायम राहिले. जम्मू काश्मीरमध्ये तसे झाले नाही.पण त्या निवडणुकीचा महाष्ट्रात परिणाम येथे होईल असे वाटत नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्रि पदाबाबत काही नेते दावा करत आहेत.

मनोज जरांगे यांच्यावर प्रश्न केला असता शरद पवार म्हणाले की मनोज जरांगे यांचा निवडणूक लढण्याचा ‘निर्णय तर होऊ द्या, निर्णय झाल्यावर मग बोलता येईल.

See also  "ती' व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडातून पुरवलेली नाहीतच केंद्र सरकारच्या वतीने धक्कादायक दावा