“ती’ व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडातून पुरवलेली नाहीतच केंद्र सरकारच्या वतीने धक्कादायक दावा 

0
slider_4552

मुंबई :

देशभर वादग्रस्त ठरलेली “ती’ व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडातून पुरवलेली नाहीतच, असा धक्कादायक दावा केंद्र सरकारच्या वतीने औरंगाबाद खंडपीठापुढे सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणीत करण्यात आला. विशेष म्हणजे, या वादग्रस्त व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणाऱ्या आणि दुरुस्तीसाठी सहकार्य न करणाऱ्या राजकोट येथील ज्योती सीएनसी कंपनीची यात चूक नसून, ही “मॉडर्न’ व्हेंटिलेटर्स वापरण्याचे “प्रशिक्षण’ असलेले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी औरंगाबादमध्ये नसल्याचा युक्तिवाद करत केंद्र सरकारने कंपनीची पाठराखण केली.

एप्रिल महिन्यात कोविड रुग्णांच्या उपचारासाठी पीएम केअर फंडातून औरंगाबादमध्ये १५० व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आली होती. त्यातील ११३ निकामी झाल्याने वापरता आली नसल्याचे तसेच पुरवठादार कंपनी ज्योती सीएमसीतर्फे त्याच्या दुरुस्तीबाबत प्रतिसाद देण्यात आला नाही, असा अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिला आहे. राज्यभरातील ही व्हेंटिलेटर्स कोविड रुग्णांच्या उपचारासाठी कुचकामी ठरत असल्याचे प्रसार माध्यमांनी उघडकीस आणले होते. त्या बातम्यांवर आधारित उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून केंद्र सरकारकडे याबाबत खुलासा मागितला होता.

या याचिकेच्या सुनावणीत केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली. त्यात ही व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडातून पुरवण्यात आली नसल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला. तसेच राजकोट येथील पुरवठादार कंपनी ज्योती सीएनसी यांची तळी उचलून औरंगाबादमधील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच ती व्हेंटिलेटर्स ऑपरेट करता आली नसल्याचा युक्तिवाद केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी जानेवारी २०१५ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौर्‍यादरम्यान वादग्रस्त सूट घातला होता. त्यावर स्ट्रिप्समध्ये नरेंद्र मोदी नाव लिहिलेले होते. त्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. विशेष ज्या कंपनीचा बचाव केंद्र सरकार कोर्टात करत आहे त्याच कंपनीच्या मालकाने मोदींना तो महागडा सूट दिला होता असं वृत्त आहे. त्यानंतर पत्रकारांमध्ये देखील चर्चा सुरु झाली आहे.
https://twitter.com/ranvijaylive/status/1398528632843161601?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1398528632843161601%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

कंपनी म्हणते, ‘अनुभ‌व नाही’, केंद्र म्हणते ‘मॉडर्न’:
याच कंपनीने गुजरात सरकारला सीएसआरमधून १० हजार व्हेंटिलेटर्स देेणगी दिली आहे. तसेच व्हेंटिलेटर्स निर्मितीतील अनुभव नसतानाही सध्याच्या परिस्थितीचा विचार करून उत्पादन सुरू केल्याचे ज्योती सीएनसी कंपनीचे म्हणणे त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आल्याचे प्रसार माध्यमांनी उजेडात आणले होते. असे असताना या सुनावणीत केंद्राने मात्र कंपनीच्या व्हेंटिलेटर्सना “मॉडर्न’ ठरवले आहे.

See also  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर लावली जाणार ११ लाख झाडे