पुणे :
गणेशखिंड येथिल मॉडर्न महाविद्यालयात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) PM-USHA, महाराष्ट्र शासन , राज्य प्रकल्प संचालनालय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या अंतर्गत प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण याविषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.







१९८४ साली भोपाळ मध्ये घडलेल्या औद्योगिक दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लोकांच्या स्मरणासाठी तसेच प्रदूषण नियंत्रण जागृतीसाठी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो. महाविद्यालयाच्या Institutions Innovation Council च्या वतीने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेण्यात आला. याप्रसंगी वनराई संस्थेतील बसवंत विठाबाई बाबाराव यांचे १९८४ साली घडलेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेचा इतिहास, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धन विषयक व्याख्यान झाले.
याचबरोबर ॲडॅपशन ऑफ अकॅडमी ऑफ बँक ऑफ क्रेडिट या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत डॉ. दीपक ननावरे प्रोफेसर आणि विभाग प्रमुख इंग्रजी विभाग डी ए व्ही वाणिज्य महाविद्यालय व डॉ श्रीहरी पिंगळे आय क्यू एस सी समन्वयक उपप्राचार्य संगमनेर कॉलेज यांचे व्याख्यान झाले. शैक्षणिक एनी पी 20-20 धोरणानुसार बदललेली शैक्षणिक पद्धती व अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट चा विद्यार्थ्यांना उपयोग व त्यांची गरज समजून सांगण्यात आली. एबीसी कसे काम करते त्याचे फायदे तोटे काय असे सगळे समजून सांगण्यात आले. ए बी सी मधून एका शैक्षणिक संस्थेमधून दुसऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये क्रेडिट कसे ट्रान्सफर करायचे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आले. या कार्यशाळेत एकूण आँनलाईन व आँफलाईन 452 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना हॅण्डस् ऑन ट्रेनिंग देवून त्यांचे एबीसीडी तयार करून घेण्यात आले. ए बी सी आय डी तयार करताना तांत्रिक अडचणी कशा सोडवाव्यात याचे मार्गदर्शन डॉक्टर श्रीहरी पिंगळे यांनी केले.
तिसरा कार्यक्रम हा प्राणीशास्त्रज्ञ विभागाचा झाला.
पी एम उषा अंतर्गत प्रायोजित स्टेम आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी तज्ञांचे व्याख्यान आयोजित केले होते. प्राणिशास्त्र विभाग प्रमुख व प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्वन्यजीव तज्ञ आणि टीम लीड, नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशनच्या डॉ. देविका रानडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला सुरुवातिला अँनिमल बिहेविअरशी संबंधित इकॉलॉजीची ओळख करून दिली. ज्यात जंगलातील प्राण्यांचे महत्त्व आणि त्यांच्या विशिष्ट वागणुकीचे महत्व व संशोधनात प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास कसा करतात हे सांगितले. यावरील आपले काही अनुभव सांगितले त्यात आगमा, जिराफ आणि मीरकॅट्स – आंध्र प्रदेशातील आगामास जिराफ प्राण्याच्या बॉडी पॅटर्नवर संशोधन करतानाचे अनुभव तसेच दक्षिण आफ्रिकेतील लॉस्कोप डॅम नेचर रिझर्व्ह येथे एका प्रकल्पावर कालाहारी मीरकट प्राण्यांच्या प्रकल्पावर स्वयंसेवक म्हणून काम करत असताना आपले अनुभव सांगितले. हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी अँनिमल बिहेवीअरशी संबंधित इकॉलॉजीच्या क्षेत्रात त्यांची आवड वाढवण्यासाठी आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी एक उत्तम शिकण्याचा अनुभव ठरला. तसेच विद्यार्थ्यांना वन्यजीवामध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रकल्प व योजनांची माहिती मिळाली आणि या क्षेत्रतील करिअर बद्दल ओळख करून दिली.
कार्यशाळेचे व व्याख्यानांचे आयोजन डॉ. दिपाली मेहेर, उपप्राचार्य, व डाॅ संगीता ढमढेरे यांनी केले तर प्रा मीनल जबडे, प्रा किशोर मोरे व प्रा मनीषा माटेगावकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
दोन्ही कार्यक्रम प्राचार्य डॉक्टर संजय खरात व आय क्यू एस सी समन्वयक डॉक्टर पराग शहा व पीएम उषा समन्वयक डॉ. विनय कुमार यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली पार पडले.








