बाणेर येथील मनपा शाळा कै. सोपानराव बाबुराव कटके विद्यालयातील विद्यार्थ्यांचा बालगंधर्व रंगमंदिरात सन्मान…

0
slider_4552

बाणेर :

पुणे महापालिकेच्या बाणेर गावातील मनपा शाळा कै. सोपानराव बाबुराव कटके प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक १५१बी मधील विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाद्वारे बालगंधर्व रंगमंदिरात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान पुणे शिक्षण विभागाचे उपायुक्त आशा राऊत, प्राथमिक विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे यांच्या हस्ते सन्मनचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी शारीरिक शिक्षण विभागाचे उपप्रशासकीय अधिकारी माणिक देवकर, सहायक प्रशासकीय अधिकारी सुनील ताकवले, विनायक तुम्मा, संघटक महेश तिकोणे, अतुल माने, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता बंड आदिंसह शिक्षण विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शाळेने सुर्यनमस्कारामध्ये मुलांच्या गटाचा द्वितीय. तर मुलिंच्या गटाला उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळाला. नाट्यप्रवेशामध्ये मोठा गटाला उत्तेजनार्थ प्रथम तर लहान गटात उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळाला. तर पूजा घुमरे हिचा उत्कृष्ठ अभिनयाचे पोरितोषीक देण्यात आले. लोकनृत्य मोठ्या गटात द्वितीय क्रमांक पटकाविला. तर मुलिंच्या लेझीममध्ये उत्तेजनार्थ तिसरा क्रमांक पटकाविला.

पूजा घुमरे ह्या विद्यार्थिनीस उत्कृष्ठ अभिनयाचे पोरितोषिक देऊन तर सुर्यनमस्काराचे नेतृत्त्व करणारे किर्तना कुंभार, ओमकार धोंडगे, लेझीम संघाचे नेतृत्त्व करणारी आशिया सुतार यांचाही सन्मान करण्यात आला.

लोकनृत्यासाठी शाळेच्या शिक्षिका अंजली कुलकर्णी, वैशाली दोरगे, नाट्यप्रवेशासाठी मयुरी शिंदे, मेघा गोरे, निलेखा तोटे, दीपा बिडवे, सुर्यनमस्कारसाठी मेघा गोरे, अश्विनी शालिवाहन, निलम तांबे तर लेझीमसाठी वैशाली कुंभार, वाद्यवाजक वैशाली दोरगे आदिंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

See also  पाषाण येथे लसीकरण सुरू