बालेवाडी :
स्त्री सबलीकरण आणि नारी शक्तीचा जागर हे उदिष्ट ठेवून अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे, स्त्रियांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनविणारे हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देणे. त्याच बरोबर दैनंदिन जीवनातून थोडासा बदल म्हणून अनेक उपक्रम राबविणारे कार्यक्रम आयोजित करून एक सकारात्मक ऊर्जा बालेवाडी परिसरात पसरावी म्हणून, कार्यरत असणाऱ्या बालेवाडी विमेन्स क्लब आणि श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या 11 आणि 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे दिमाखात उदघाट्न झाले.
विशेष आकर्षण ठरले ते मुले आणि मुली यांच्या समिश्र संघात लहान मुलींचा क्रिकेट खेळातील वाढता सहभाग! अतिशय उत्साहाने सुरु झालेल्या ह्या स्पर्धाना बालेवाडी बाणेर मधील विविध सोसायटी मधील लहानग्यानीदिलेला उदंड प्रतिसाद.
क्लब च्या संचालिका प्रोफेसर रुपाली बालवडकर यांनी क्लब च्या माध्यमातून चालू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. दैनंदिन जीवनातून एक छोटासा विरंगुळा आणि समाजाप्रती आपले ऋण फेडण्याची कर्तव्याची संधी म्हणून क्लब सर्वांसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले.
लहान मुलांना मोबाईल फोन व विडिओ गेम पासून दूर करून क्रीडांगणावर क्रिकेट खेळात सहभाग वाढावा म्हणून व मुलांना मनसोक्त खेळता आले पाहिजे. या निमित्ताने सोसायटीतील लोकांनी एकत्र यावे ह्या हेतूने 11 आणि 14 वर्षाखालील स्पर्धा आयोजित केल्याचे डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांनी सांगितले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब बालवडकर यांनी चिमुकल्याना शुभेच्छा दिल्या. बालेवाडी सुपर किंग्स चा कर्णधार विश्वजीत बालवडकर याने मशाल पेटवून केली, सर्व संघांच्या कर्णधारांनी “टॉर्च रन ”मध्ये सहभाग घेतला आणि स्पर्धा सुरु झाल्याचे घोषित केले. ह्या प्रसंगी क्लब च्या विविध सदस्यांनी स्टॉल च्या माध्यमातून सामना पाहायला आलेल्यांचे लक्ष वेधून घेतले.
सदर स्पर्धा ही रोज संध्याकाळी संस्थेच्या मैदानावर चालू असून परिसरातील सर्व रहिवासी यांनी आवर्जून पाहावी आणि लहान मुलांना प्रोत्साहन द्यावे असे डॉ. सागर आणि प्रोफेसर रुपाली बालवडकर यांनी सांगितले.