औंध रोड राजे ग्रुप च्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम..

0
slider_4552

औंध :

औंध रोड येथील राजे ग्रुप च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली,या वेळी मनसे राज्य सरचिटणीस रणजित शिरोळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयामार्फत मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यामध्ये नागरिकांची डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली व ज्या नागरिकांचे मोती बिंदुचे निदान झाले त्यांची मोफत शस्त्रक्रिया देखील करण्याची देखील व्यवस्था करण्यात आली. तसेच नागरिकांना उष्ण उन्हामध्ये थंडाव्यासाठी थंड पेय म्हणून ७० लिटर कलिंगड सरबत वाटण्यात आला. राजे ग्रुप तर्फे दुसऱ्या दिवशी १८ मार्च रोजी औंध रोड येथील भाऊ पाटील पडळ वसाहतीमध्ये छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत छाव चित्रपट दाखवण्यात आला. या वेळी खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे,औंध येथील उद्योजक अभिजित गायकवाड, जयश्री मोरे, राजश्री कांबळे, वैशाली चव्हाण, दत्ता रणदिवे, आर पी आय नेते संजय कांबळे, किशोर वाघमारे, रवींद्र नितनवरे उपस्थीत होते.

सदर कार्यक्रमाचे नियोजन राजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मयूर बोलाडे यांनी केले होते. पूर्ण कार्यक्रम पार पाडण्यात मोलाचा वाटा सिद्धांत अडसूळ, समीर शेळके,अमित गोणेकर, ऋषिकेश माने, विनोद शिंदे, ज्ञानेश्वर भिसे,महेश गायकवाड, राकेश बोलाडे, रोहन अडसूळ यांनी उचलला.

See also  बोपोडीत पूर्व वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार