श्री खंडेराय प्रतिष्ठान व बालेवाडी विमेन्स क्लब आयोजित एसकेपी किड्स प्रीमिअर लीगमध्ये 43 प्रायव्हेट ड्राइव्ह संघ प्रथम ! 

0
slider_4552

बालेवाडी :

गेल्या एक महिन्यापासून सुरु असलेल्या 11आणि 14 वर्षाखालील क्रिकेट सामन्यांची सांगता काल अतिशय जल्लोष पूर्ण वातावरणात झाली. शेवटच्या चेंडू पर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या वातावरणात परिसरातील सर्व क्रिकेट प्रेमीनी खेळाचा आनंद लुटला.

11 वर्षाखालील सामन्यात 43 प्रायव्हेट ड्राइव्ह संघ प्रथम

एलाईट एम्पायर -द्वितीय तर पार्क एक्सप्रेस -तृतीय स्थानावर राहिले.

14 वर्षाखालील सामन्यात 43 प्रायव्हेट ड्राइव्ह संघ -प्रथम कमफर्ट झोन संघ -द्वितीय तर ओरवी संघ तृतीय स्थानावर आले.

मागील एक महिन्यात आम्हाला क्रिकेट चा मनसोक्त आनंद लुटता आला अशी प्रतिक्रिया लहानग्यानी दिली.

आज विज्ञान युगात लहान मुले मोबाईल किंवा तत्सम उपकरणांमुळे त्यांचं बालपण हरवत आहेत, उन्हाळयांच्या सुट्टीत त्यांनी मैदानी खेळाचा आनंद लुटावा,मुलांच्या निमित्ताने पालकांनी एकत्र यावे आणि खेळाचा आनंद लुटावा हा हेतू यशस्वी झाल्याचे बालेवाडी विमेन क्लब च्या संस्थापिका अध्यक्ष प्रो. रुपाली बालवडकर यांनी सांगितले.

बालेवाडी परिसरातील लोकांचा उदंड प्रतिसाद आणि जल्लोष पाहून पुढील वर्षी आणखीन नवीन वयोगटातील मुलांसाठी ही स्पर्धा आयोजित करू असे संस्थेचे सचिव डॉ सागर बालवडकर यांनी सांगितले.

विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन करून बालेवाडी बाणेर परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आहे. त्याबद्दल अनेक नागरिकांनी बालेवाडी विमेन्स क्लब आणि श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे आभार मानले.

ह्या प्रसंगी संस्थेचे संस्थांपक अध्यक्ष आप्पा साहेब बालवडकर यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सर्व सभासद, पदाधिकारी आणि परिसरातील रहिवासी बक्षीस समारंभ साठी हजर होते.

See also  गिरिधर कट्ट्यावर रंगल्या पर्यावरण प्रेमिंच्या स्मार्ट गप्पा...