बालेवाडी शिवनेरी पार्क येथील वीज २४ तासानंतर झाली पूर्ववत… नागरिकांना सोसावा लागला त्रास…

0
slider_4552

बालेवाडी :

गुरुवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाने शिवनेरी पार्क येथील वीज 24 तास गायब झाल्याने येथील नागरिक चांगलेच त्रस्त झाले होते. गेले अनेक वर्ष या ठिकाणी पाणी साचत असून याही वर्षी पहिल्या पावसातच पाणी साचले होते. यामुळे या ठिकाणी असलेला विजेचा डीपी नादुरुस्त झाला त्याचा त्रास येथील नागरिकांना सोसावा लागला.

या ठिकाणी पाणी साचल्यामुळे विजेच्या डीपीला पाणी लागले व २४ तास उलटून गेले तरी विजेचा पुरवठा मात्र येथील नागरिकांना सुरू झाला नव्हता. गुरुवारी मुसळधार पावसामध्ये चार वाजायच्या आसपास गेलेली लाईट अखेर कार शुक्रवारी सायंकाळी सहा वाजायच्या आसपास आली. या दुरुस्तीला जवळपास 24 तास कालावधी लागल्याने येथील नागरिक मात्र त्रस्त झाले होते. ही स्मार्ट सिटी ग्रामीण भागातही यापेक्षा जास्त लवकर दुरुस्ती होऊन विद्युत पुरवठा सुरळीत होतो. परंतु २४ तास होऊन गेले तरी या ठिकाणी होत नसल्याचे नागरिकांनी खंत व्यक्त केली.

महापालिकेचा चा अजब कारभारा मुळे दरवर्षी या समस्येला शिवनेरी पार्कमधील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणी साचणारे पाणी काढण्यास महानगरपालिका असमर्थ ठरत असल्याने दोन्ही त्रास येथील नागरिकांना सहन करावे लागत आहे.

See also  बाणेर बालेवाडी च्या गंभीर पाणी प्रश्ना बाबत पालिका अधिकारी निष्क्रिय, भाजपा पदाधिकाऱ्यांचे ठिय्या आंदोलन...