औंध येथील स्व. गोपीनाथ मुंडे सभागृहाचे पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री नामदार पंकजा मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण

0
slider_4552

औंध :

माजी नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या प्रयत्न व स्थानिक विकास निधी मधून उभारलेल्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या अत्यंत गरजेच्या व्यवस्था उभारणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असून आहे. यातून लोकोपयोगी असे सांस्कृतिक भवनाचे काम या ठिकाणी करण्यात आले आहे. तसेच स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आदर व प्रेमापोटी या इमारतीला देण्यात आलेल्या नावातून जनमानसामध्ये आजही स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दलचा आदर व प्रेमभाव आजही तितकाच उत्कटतेने दिसून येतो. मुसळे दाम्पत्यांनी उभारलेल्या सांस्कृतिक भवनातून नागरिकांचे फार मोठे सोय होणार आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

औंध, बाणेर भागात नागरिकांसाठी एकही सभागृह उपलब्ध नसल्याने नागरिकांना वैयक्तिक किंवा सार्वजनिक स्वरूपाचे कुठले कार्यक्रम करण्यास कुठलीही सार्वजनिक अथवा खाजगी व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी माजी नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या प्रयत्नाने व स्थानिक विकास निधी मधून तसेच ॲड. डॉ. मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून हे सांस्कृतिक भवन उभारण्यात आले असे ॲड. डॉ.  मधुकर मुसळे म्हणाले.

आम्ही औंध स्मार्ट सिटी म्हणून विकसित करतानी आम्ही नागरिकांच्या सर्वांगीण गरजा पूर्ण करण्यासाठी सांस्कृतिक , सामाजिक व वैयक्तिक स्वरूपाचे कार्यक्रम करण्यासाठी ह्या सुंदर संस्कृतीक भवनाची निर्मिती केली असे नगरसेविका अर्चना मुसळे यांनी सांगितले.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड नाव नगर विकास प्राधिकरण चे अध्यक्ष सदाशिव खाडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर केशवराव घोळवे, मजी नगरसेविका अर्चना मुसळे, स्वप्नाली सायकर, माजी नगरसेवक दत्ताभाऊ खाडे, भाजपा शहर सरचिटणीस रवींद्र साळेगावकर शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष शैलेश बडदे भाजपा नेते शेंडगे इत्यादी उपस्थित होते.

See also  जर्मनीत औध येथील स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे महान कार्य