नवी दिल्लीः
टीव्हीएसने आपली इलेक्ट्रिक स्कूटर आयक्यूबी (iQube) आता दिल्लीत सुद्धा लाँच केली आहे. या ठिकाणी याची किंमत १ लाख ८ हजार रुपये ठेवली आहे. ग्राहकांना ५ हजार रुपयांच्या अमाउंटवर ही स्कूटर ऑनलाइन बुक करता येऊ शकणार आहे. या स्कूटरला वर्षभरापूर्वी बेंगळुरू मध्ये लाँच करण्यात आले होते. या ठिकाणी या स्कूटरची किंमत १ लाख १५ हजार रुपये आहे. दिल्लीत या स्कूटरची किंमत ७ हजार रुपयांनी स्वस्त आहे.
या स्कूटरमध्ये ४.४ इलेक्ट्रिक मोटर आणि लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. ही ५ तासांत चार्ज होते. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जवर याची रेंज ७५ किलोमीटर पर्यंत जाते. ही स्कूटर शून्य ते ४० किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडण्यासाठी ४.२ सेकंद घेते. स्कूटरची टॉप स्पीड ७८ किलोमीटर प्रति तास आहे. यात पॉवर आणि इकॉनॉमीचे दोन रायडिंग मोड दिले आहे. या स्कूटरमध्ये हँडल दरम्यान ब्लॅक काउल आहे. स्कूटरमध्ये यू शेप एलईडी डीआरएल, क्रिस्टर क्लियर एलईडी हेडलॅम्प दिले आहे. स्कूटरमध्ये कनेक्ट टेक्नोलॉजी सोबत स्मार्ट एक्सकनेक्ट प्लॅटफॉर्म दिला आहे. या स्कूटरमध्ये क्यू पार्क असिस्ट, डे अँड नाइट डिस्प्ले आणि रिजनरेटिव ब्रेकिंग यासारखे खास फीचर्स दिे आहे.
तसेच जियो-फेंसिंग, नेविगेशन असिस्ट, रिमोट बॅटरी चार्ज स्टेटस, लास्ट पार्क लोकेशन, इनकमिंग कॉल अलर्ट आणि एसएमएस अलर्ट सारखे फीचर्स दिले आहेत.