बालेवाडी :
बालेवाडी येथील CM international school येथे स्कूल च्या वतीने कोरोणा काळातील ऑनलाइन पद्धतीने कामाच्या ताण व शारीरिक आरोग्य चांगले राहण्यासाठी शाळेच्या वतीने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यासाठी विशेष इंटर हाऊस ऍक्टिव्हिटी टीम बिल्डिंग प्रोग्राम अंतर्गत आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. सागर बालवडकर सचिव श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्था यांच्या हस्ते झाले
यावेळी बोलतांना डॉ. सागर बालवडकर यांनी सांगितले की शाळेचा सर्व स्टाफ उत्साहात काम करत असतो करोणा महामारी मुळे सर्वांनाच मानसिक ताण आलेला होता म्हणुन संस्थेने विविध ऍक्टिव्हिटी आयोजित केल्या आहेत. त्यामध्ये सर्व जण उत्साहात सहभागी व्हा, त्यामूळे निश्चित सर्वांमध्ये उत्साह येईल व आरोग्यदायी जीवनासाठी व्यायामाचे महत्व सर्वांना कळेल. संस्था नेहमीच आपल्या स्टाफ ची योग्य काळजी घेत असते सर्वांनी खेळाचा आनंद घ्या व आपले आरोग्य चांगले राखा असेही डॉ.सागर बालवडकर यांनी मार्गदर्शनात सांगितले.