नवनिर्वाचित शिवसेना पदाधिकाऱ्यांचा बाणेर नागरी तर्फे सत्कार.

0
slider_4552

बाणेर :

बाणेर नागरी पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष दिलीप मुरकुटे यांनी आज शिवसेना प्रभागांतील पदाधिकाऱ्यांची निवड झाली म्हणुन त्यांचा सत्कार केला. नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांना पाठबळ मिळावे, व शिवसेना वाढावी या उदात्त हेतूने ज्येष्ठ मार्गदर्शक आणि शिवसैनिक म्हणुन डॉ. मुरकुटे यांनी सर्वांचा सत्कार केला.

या वेळी बोलताना आशुतोष आमले शिवसेना पुणे उपशहर संघटक म्हणाले की, संघटना म्हणुन सर्वांनी एकत्र काम करुन शिवसेना वाढवायची आहे. त्या साठी नेहमीच दिलीप मुरकुटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. बाणेर बालेवाडी मध्ये शिवसेना वाढवण्याचे काम दिलीप मुरकुटे यांनी केले आहे. त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनखाली भगवे वादळ निर्माण करू असे सांगितले.

विभाग संघटक सुनील कळमकर यांनी सांगितले की, पक्ष प्रमुखांनी सांगितल्या प्रमाणे सर्वांच्या सहकार्याने शिवसेना घराघरात पोहचवू.

दिलीप मुरकुटे यांनी सांगीतले की पद येते जाते पण तरी शिवसैनिक म्हणुन शिवसेना वाढवली पाहिजे. या साठी प्रत्यकाने चांगले काम केले पाहिजे. तसेच आपण शिवसैनिक म्हणुन कसे काम केले याचे अनुभव सांगीतले.

या प्रसंगी आशुतोष आमले शिवसेना पुणे उपशहर संघटक, सुनील कळमकर विभाग संघटक कोथरूड मंतदार संघ, मकरंद कळमकर विभाग समन्वयक कोथरूड मंतदार संघ, शाम बालवडकर उपविभाग प्रमुख कोथरूड मंतदार संघ, युवा नेते अजय निम्हण, संतोष भोसले आदी उपस्थित होते.

See also  गिरिधर कट्ट्यावर रंगल्या पर्यावरण प्रेमिंच्या स्मार्ट गप्पा...