औरंगाबाद :
सोलापूर-विजापूर महामार्गावर सुरु असलेल्या ४- लेन कामांतर्गत २५.५४ किलोमीटरचे सिंगल रोड डांबरीकरणाचे काम अवघ्या अठरा तासात पूर्ण करून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ही बातमी सोशल मीडियावर टाकत या कामासाठी ठेकेदार कंपनी आणि मजुरांचे कौतुक केले. या कामाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार अशी माहिती त्यांनी दिली.
फक्त अठरातासात जवळजवळ २६ किमीचा रस्त्यावर डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या कामाची दाखल थेट लिम्काबुक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. या कामात तब्बल पाचशे मजुरांचा सहभाग होता. या महामार्गाचे काम एका खाजगी कंपनीकडे कंत्राटी पद्धतीने देण्यात आले होते.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोलापूर – विजापूर महामार्गाचे काम जलदगतीने करत मोठी किमया करत सर्वांनां आश्चर्याचा मोठा धक्का दिला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच्या खात्या अंतर्गत होणारी कामे ही जलदगतीने होतात हे सर्वांनां ठाऊकच आहे.मागील पाच वर्षात अनेक मोठी महामार्गांचे काम जलदगतीने करण्याचा बहुमान गडकरीयांच्याकडे आहेच. पण त्यात आता भर पडलेली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कामाचे कौतुक समाजमाध्यमाद्वारे केले आहे त्यात त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण निर्देशक, अधिकारी, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. सध्या सोलापूर विजापूर महामार्गाचे ११० किमीचे काम चालू आहे हे काम ऑक्टोबर २०२१ पर्यंत होईल अशी माहिती गडकरी यांनी आपल्या पोस्टमधून दिली.