बाणेर :
जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने बाणेर येथे मनसे च्या वतीने फोन पे च्या इतर भाषेतील 50000 स्टिकरचे होळी केली. बाणेर मधील बहुतांशी भागांमध्ये फोन पे आपली जाहिरात करण्यासाठी मराठी भाषा सोडून इतर भाषेचे स्टिकर चिटकत आहे, असे निदर्शनास आले म्हणून मनसेच्या वतीने सर्व स्टीकर जप्त करून त्याची होळी करण्यात आली.
यावेळी फोन पे बाणेर येथील कार्यालया मध्ये जाऊन त्यांना सर्व प्रकारचे इतर भाषेतील स्टिकर मागे घेण्याचे सूचना करण्यात आली व तसे निवेदन दिले. सर्व स्टिकर्स मागे घेण्यासाठी 15 दिवसाची मुदत मनसेच्या वतीने फोन पे देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत सदर सर्व स्टिकर्स मागे घेतले नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल अशी सूचना फोन पे ला देण्यात आली.
या वेळी मनसे उपविभाग प्रमुख अनिकेत मुरकुटे यांनी सांगितले की, सदर स्टिकर लवकर काढायला सांगीतले आहे. फोन पे जाणून बुजून अशा प्रकारची स्टिकर पुण्यामध्ये लावत आहे, असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. त्यामुळे त्वरित हे स्टिकर मागे घ्यावेत अन्यथा मनसेचा दणका दाखविला जाईल. या प्रसंगी अशोक दळवी, रमेश उभे त्यांनीदेखील आक्रमकपणे स्टिकर मागे घ्यावेत अशी मागणी केली. त्यांच्या सोबत गणेश चव्हाण, माऊली मोरे, अभिजीत चौगुले आदी उपस्थित होते.
पहा व्हिडिओ फोन पे विरोधातील मनसेचे आंदोलन