बाणेर :
खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी स्पर्धा गुलमर्ग (जम्मू काश्मीर ) येथे (ता. 26 फेब्रु. ते 3 मार्च) दरम्यान पार पडल्या. या स्पर्धेमध्ये स्पीड आइस स्केटिंग या प्रकारांमध्ये महाराष्ट्राने उत्तम कामगिरी करत दोन सुवर्ण व दोन रोप्य पदके पटकावली.




गुलमर्ग (जम्मू कश्मीर) येथे नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी स्पर्धा 2021 मध्ये बाणेरचा सुमित संजय तापकीर या स्केटर ने स्पीड आइस स्केटिंग मध्ये एक सुवर्णपदक व एक रौप्य पदक मिळवले. तर मुंबईच्या सोहन तारकर याने एक सुवर्णपदक व एक रौप्य पदक पटकावले.
बाणेरचा सुपुत्र सुमित संजय तापकिर हा असून, तो भारती विद्यापीठमध्ये प्रशिक्षण घेत आहे. तसेच त्याचा रोजचा सराव संजोग तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली यंगस्टर स्पोर्ट्स क्लब बाणेर येथे सुरू आहे. सुमित याला अस्मिता जगताप यांचे ही मार्गदर्शन लाभते. सुमित ने यापूर्वीही राष्ट्रीय आइस स्केटिंग मध्ये अनेक पदके पटकावली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जागतिक पर्सनल रेकॉर्ड ही बनवला आहे. एशियन स्पर्धेत रिले मध्ये सुद्धा त्याला रौप्य पदक मिळाले आहे.
खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील दोन खेळाडूंची निवड आनंद यादव (सेक्रेटरी महाराष्ट्र) यांच्या कडून करण्यात आली. यास्पर्धेत अनेक राज्यांच्या स्केटर ने सहभाग घेतला होता. यावेळी 500 मीटर आइस स्केटिंग मध्ये महाराष्ट्रकडून सुमित तापकीर (बाणेर ) यांने सुवर्णपदक, रोहन तारकर (मुंबई )याने रोप्य पदक, प्रिक्षित करोलिया (हरियाणा )कास्य पदक, तर एक हजार मीटर मध्ये सोहन तारकर याने सुवर्णपदक तर सुमित तापकीर याने रौप्यपदक, तर दिल्लीच्या अनुभव गुप्ता ला मात्र कास्य पदकावर समाधान मानावे लागले. या वेळी राजू दाभाडे (जनरल सेक्रेटरी ऑफ आइस स्केटिंग असोसिएशन ऑफ इंडिया ) व अवधूत तावडे (महाराष्ट्र स्केटिंग संघाचे प्रशिक्षक) यांनी स्केटर्सला मार्गदर्शन केले.









