औंध :
सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर स्पोर्ट्स क्लब आयोजित टेनिस बॉल हाप पिच नाईट क्रिकेट स्पर्धेचा ‘सोमेश्वर चषक’ आरडीएक्स खडकवासला तर द्वितीय क्रमांक अमोल जोरे युवा मंच यांनी पटकावला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सुनील काशीद पाटील असिस्टंट कमिशनर जीएसटी मुंबई व माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी विश्वनाथ जाधव, संतोष जोरे, नारायण जाधव, अजय काकडे, अतुल काकडे, गणेश जाधव, संतोष अरगडे, राजू आरगडे, पांडुरंग बामगुडे, बाळा येवले, सोमनाथ काकडे, संतोष काकडे, नीलेश काकडे, अमित दातार, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनील काशीद म्हणाले की, खेळाडू वृत्तीला वाव देण्यासाठी अशा स्पर्धा आयोजित करणे हे महत्त्वाचे आहे. लहान मुलापासून तरुणांचा कल सध्या मोबाईल कडे असल्याने असे मैदानी खेळ जास्तीत जास्त खेळले जावे यासाठी विविध मैदानी खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करणे गरजेचे आहे.
सनी निम्हण यांनी सांगितले की, सोमेश्वर स्पोर्ट क्लब नेहमी विविध स्पर्धेचे आयोजन करत असते. मुलांनी जास्त जास्त कसे मैदानी खेळ खेळावे यासाठी हे स्पोर्ट क्लब प्रयत्नशील असते. कोरोनामुळे ही लहान मुलांमधील मैदानावर खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु या स्पर्धेमुळे पुन्हा एकदा लहानपासून तरूणांपर्यंत खेळण्याची संधी प्राप्त करून दिली आहे.
आयोजक :
विष्णू काकडे, अवि गायकवाड, मंगेश घोलप, निखिल सपकाळ, रोहित किरदान, तुषार भामगुडे, शिवम दळवी, निखिल आरगडे, अमोल जोरे, ऋषिकेश येवले, राकेश बामगुडे, गणेश निम्हण, रावण जाधव आदित्य मारणे, प्रदिप घोगटे यांनी स्पर्धेचे नियोजन केले होते.
सोमेश्वर चषक २०२१
प्रथम क्रमांक – आर.डी.एक्स खडकवासला (रोख रक्कम 35,555 आणि आकर्षक चषक )
द्वितीय क्रमांक – अमोल जोरे युवा मंच (रोख रक्कम 25,555 आणि आकर्षक चषक)
तृतीय क्रमांक – ए.बी 11 (रोख रक्कम 15,555 आणि आकर्षक चषक
चतुर्थ क्रमांक – सोमेश्वर स्पोर्ट्स क्लब (रोख रक्कम5,555 आणि आकर्षक चषक)